मैत्री, कटु अनुभव आणि नवीन प्रेमत्रिकोण
समीरला ज्या कॉलेजने नाकारले होते, तिथेच प्रवेश मिळाल्याने त्याला खूप आनंद झाला होता. त्याला भेटायला मयूर आणि शरद आले. त्यांनी चहा घेतला आणि कॅन्टीनमध्ये नाश्ता केला. मयूर म्हणाला, "मी तुला रोज भेटायला येत जाईन." पण समीर म्हणाला, "हे कॉलेज खूप कडक आहे रे, आय-कार्डशिवाय आत येऊ देत नाहीत. तुला काळजी घ्यावी लागेल. मी सांगेन की तू माझा भाऊ आहेस, पण रोज हे जमणार नाही, कारण १२ वीचे कॉलेज एवढे कडक नव्हते." शरदनेही समीरच्या म्हणण्याला दुजोरा दिला. तिघे हसले, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, जणू काही समीरच्या यशात त्यांचाही विजय होता. मयूर पुन्हा म्हणाला, "आता नवीन लव्हचा श्रीगणेशा कर दोस्ता!" समीर हसून म्हणाला, "आता नाही जमायचं हे, कारण एवढं दुःख नाही पचणार या दिलाला." मयूरने छेडीत म्हणाला, "ये दिल मांगे मोअर!" हसत-हसत समीरने गेटवर त्यांचा निरोप घेतला आणि तो कॉलेजमध्ये जात होता. अचानक, कॉलेजच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी त्याची नजर एका मजुरावर पडली. तो समीरचा १० वी मधला दोस्त, रावण होता. वीटा उचलत असलेला रावण समीरला पाहून तोंड लपवू लागला, पण ...