गुपचूप माहिती आणि 'भैरवी' नाव
व्हॉइस ओव्हर (समीर) भैरवीलाही माझ्या पाहण्यामुळे माझी माहिती कशी मिळवावी, या विचारात होती. आणि योगायोगाने मला एक 'गुपचूप' माहिती देणारा दोस्त भेटला.
एके दिवशी कॉलेजमध्ये मी माझ्या एका दोस्तासोबत उभा होतो. तो अचानक म्हणाला:
कॉलेजचा दोस्त (CD) चल रे! आपण बाहेर जाऊ, चहा प्यायला!
समीर (S) थोडा वेळ थांब! (मी भैरवीला पाहत होतो.)
कॉलेजचा दोस्त (CD) (तो मुलगा अचानक) तू त्या मुलीकडे पाहत असतोस का रे? अरे, तिच्या घरी मी म्हशीचे दूध द्यायला जातो!
व्हॉइस ओव्हर (समीर) काय बोलणार! मला जणू खजिनाच मिळाला!
समीर (S) (त्या दोस्ताला) मला ती फार आवडते रे!
व्हॉइस ओव्हर (समीर) नेमके त्याचवेळी भैरवी त्या मुलाला (दूधवाल्याला) कॉलेजमध्ये भेटली आणि त्याला काहीतरी बोलली.
समीर (S) (उत्सुकतेने) काय बोलली रे ती?
कॉलेजचा दोस्त (CD) अरे! तुझ्यामुळे माझं दूध देण्याचं काम बंद होईल! ती बोलते पाणी जास्त टाकतो दुधात! अरे यार! माझं दुधाचं काम बंद करतो वाटते तू!
समीर (S) (हसून) टेन्शन घेऊ नकोस!
व्हॉइस ओव्हर (समीर) त्या दोस्ताने मला तिचे नाव सांगितले: भैरवी!व्हॉइस ओव्हर (समीर) माझी गुपचूप प्रेम सफर सुरू झाली! मला समजले की, भैरवी रोज शनिवारी शनी मंदिरात जाते.
समीर (S) (स्वतःशी) मी आता मनीषासाठी नाही, तर भैरवीसाठी शनिवारी शनी मंदिरात जाणार!
व्हॉइस ओव्हर (समीर) मी दर शनिवारी तिला पाहायला जायचो. मी तिच्या मागे तिच्या घरापर्यंत जायचो. ती घरी पोहोचल्यावर मी मागे वळायचो.
मला खूप मजा येत होती.
मनीषाच्या एकतर्फी प्रेमात जो आनंद होता, तोच आनंद मला भैरवीच्या गुपचूप पाहण्यात मिळत होता.
मी तिच्यापेक्षा लहान असल्यामुळे आणि ती माझ्याकडे पाहत नसल्यामुळे, मला भीती वाटत नव्हती.
मयूर आणि मी बोलायचो: भैरवी दिसली की...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा