मैत्री, कटु अनुभव आणि नवीन प्रेमत्रिकोण
समीरला ज्या कॉलेजने नाकारले होते, तिथेच प्रवेश मिळाल्याने त्याला खूप आनंद झाला होता. त्याला भेटायला मयूर आणि शरद आले. त्यांनी चहा घेतला आणि कॅन्टीनमध्ये नाश्ता केला. मयूर म्हणाला, "मी तुला रोज भेटायला येत जाईन." पण समीर म्हणाला, "हे कॉलेज खूप कडक आहे रे, आय-कार्डशिवाय आत येऊ देत नाहीत. तुला काळजी घ्यावी लागेल. मी सांगेन की तू माझा भाऊ आहेस, पण रोज हे जमणार नाही, कारण १२ वीचे कॉलेज एवढे कडक नव्हते." शरदनेही समीरच्या म्हणण्याला दुजोरा दिला. तिघे हसले, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, जणू काही समीरच्या यशात त्यांचाही विजय होता.
मयूर पुन्हा म्हणाला, "आता नवीन लव्हचा श्रीगणेशा कर दोस्ता!" समीर हसून म्हणाला, "आता नाही जमायचं हे, कारण एवढं दुःख नाही पचणार या दिलाला." मयूरने छेडीत म्हणाला, "ये दिल मांगे मोअर!" हसत-हसत समीरने गेटवर त्यांचा निरोप घेतला आणि तो कॉलेजमध्ये जात होता.
अचानक, कॉलेजच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी त्याची नजर एका मजुरावर पडली. तो समीरचा १० वी मधला दोस्त, रावण होता. वीटा उचलत असलेला रावण समीरला पाहून तोंड लपवू लागला, पण समीरने त्याला हाक मारली, "अरे दोस्ता, तू इथे कसा काय? आणि हे काय हाल करून बसलास तुझे?"
रावणने डोळ्यात पाणी आणून आपली कहाणी सांगितली, "अरे, मी माझ्या आयुष्याची वाट लावून घेतली रे! १० वीला असताना मी प्रेम केले आणि घरच्यांचा विरोध पत्करून लव्ह मॅरेज केले. माझे वय जास्त होते, मी समीरपेक्षा ४ वर्षांनी मोठा असून अनेक वेळा १० वी मध्ये नापास झालो होतो." रावण पुढे म्हणाला, "अरे, लव्ह करू नये रे! मी मस्तीत केले आणि माझे हे हाल चालू झाले आहेत. समीर, तू ३६% घेऊन या कॉलेजमध्ये कसा आलास रे? हा एक चमत्कार आहे दोस्ता! तुला एक सांगतो, मुलींच्या मागे लागू नकोस, हे फक्त एक आकर्षण असते. नंतर आयुष्य बरबाद होते माझ्यासारखे. शिकलो असतो तर आज मोठा साहेब असतो." रावणने समीरचा निरोप घेतला. रावणच्या या बोलण्याने समीरला आयुष्याचे काही नियम समजावले होते.
समीरने ही गोष्ट मनात ठेवली आणि कॉलेजमध्ये गेला. अर्थशास्त्र, इतिहास, मराठी आणि इंग्रजीचे सर्व वर्ग तो नियमितपणे अटेंड करत होता. मनीषा आणि भैरवीनंतर, समीरला त्याच कॉलेजमध्ये एक मुलगी दिसली. तिचे नाव रेश्मा. ती फार सुंदर होती आणि समीरला पाहताच आवडली. रावणने दिलेला सल्ला विसरून तो पुन्हा तिच्या प्रेमात पडला आणि तिला कसे बोलावे या विचारात होता. रेश्मा त्याच्याच मराठी विषयाच्या वर्गात होती. ती फार हुशार होती, तिला संगीत आणि मराठी समाजशास्त्र हे विषय होते.
समीरने तिला बोलण्याची एक युक्ती शोधली - मराठीच्या नोट्स मागणे. समीरने तिला नोट्स मागितल्या. ती म्हणाली, "माझ्याकडे नाहीत." पण समीरने पुन्हा-पुन्हा नोट्स मागणे सुरूच ठेवले. टायसन त्याला बोलायचा, "तिला नोट्स मागू नकोस, ती तुला ओरडेल!" पण समीरने टायसनला सांगितले, "ती मला रागावत नाही, हसते पाहून!"
समीरने एक चूक केली. त्याला प्रोफेसर शिकवत असताना वेगाने नोट्स काढता येत नसत, त्यामुळे त्याचे नोट्स अर्धवट असायचे. त्याने अर्थशास्त्राच्या वर्गातील निमा नावाच्या मुलीलाही नोट्स मागितल्या. निमा खूप वेगाने नोट्स काढायची. समीरला माहीत होते की हा विषय अवघड आहे आणि नोट्सशिवाय अभ्यास होणार नाही. निमाने त्याला वही दिली आणि झेरॉक्स काढून घ्यायला सांगितले. समीरकडे पैसे अपुरे असल्याने तो त्या नोट्स लिहून काढू लागला आणि दोन दिवसांनी नोट्स परत देण्याचे वचन दिले.
इकडे समीर आणि रेश्माचे प्रेम हळूहळू जुळत होते. दोघेही लांबून एकमेकांकडे पाहून हसायचे. पण दोन दिवस झाले तरी समीरने निमाला नोट्स दिल्या नव्हत्या. अचानक, निमा आली आणि तिने समीरला अर्थशास्त्राच्या नोट्स परत मागितल्या. हे सर्व रेश्माने पाहिले. तिला खूप राग आला. जे प्रेम जुळणार होते, त्याला एक उभी भिंत उभी राहिली होती.
एके दिवशी कॉलेजबाहेर रेश्मा समीरला भेटली. त्यावेळी टायसन समीरसोबतच होता. रेश्माने समीरला खूप रागावले, "तू मला मराठीच्या नोट्स का मागतो आहेस, नालायक, मूर्ख! यानंतर मला नोट्स मागितल्यास मी प्रिंसिपलकडे कंप्लेंट करेन!"
समीरसाठी हा तिचा प्रेमाचा 'ब्रेकअप' होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा