५ वर्षांनी भेट आणि वास्तवाचा दणका
व्हॉइस ओव्हर (समीर) पाच वर्षे याच आवारा आणि विरहाच्या जीवनात गेली. मी ना शिक्षण घेतलं, ना काम. मी अजूनही त्या झाडाखाली मनीषाच्या आठवणीत रमत होतो.व्हॉइस ओव्हर (समीर) आणि मग तो दिवस आला, जेव्हा माझी मनीषाशी भेट होणार होती.
पाच वर्षांनी, एका कार्यक्रमात समीरची मनीषाशी भेट होणार होती. त्याचे जुने मित्र त्याला जबरदस्तीने तिच्याकडे घेऊन गेले.
"अरे, मनीषा आली आहे, खूप दिवसांनी भेटूयात!"
समीर खूप नाराज होता आणि त्याला त्याची फजिती होणार याची भीती वाटत होती.
त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि अपेक्षेप्रमाणे, "किती मार्क्स पडले?" हा प्रश्न सुरू झाला. मित्रांनी उत्साहाने आपले गुण सांगितले.
मनीष मात्र फक्त समीरकडे पाहत होती, तिचे डोळे त्याचे उत्तर ऐकण्यासाठी थांबले होते.
समीरने कसेबसे ३६.१६% गुण मिळाल्याचे सांगितले.
मनीषा ने त्याला शांतपणे आणि समजूतदारपणे पाहिले आणि म्हणाली: "नेक्स्ट टाईम चांगला अभ्यास कर."
तिचे हे साधे वाक्य समीरसाठी पराभवाचा आणि वास्तवाचा सर्वात मोठा दणका होता.
"ती कुठे आणि हा कुठे!"
तिचे ९२% आणि त्याचे ३६.१६%—हा जमीन-आसमानाचा फरक होता. या भेटीनंतर त्याला कळून आले की, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या आता तो तिला प्रपोज करण्याच्या लायकीचा नाही. तो काय म्हणून तिला जवळ बोलवणार?
व्हॉइस ओव्हर (समीर) मनीषा च्या एका वाक्याने माझ्या डोळ्यावरची पट्टी कायमची काढली. मी माझ्या एकतर्फी प्रेमासाठी स्वतःचं आयुष्य कसं उध्वस्त केलं, हे मला त्या क्षणी जाणवलं.
या भेटीमुळे समीरने मनीषाला विसरण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या 'हवेसारख्या' असलेल्या प्रेमाला आणि तिच्या आठवणींना कायमचा निरोप दिला.
आणि अशा प्रकारे, एका अबोल, एकतर्फी प्रेमाचा अंत झाला. समीर प्रेमात हरला, पण त्याने वास्तवाचा स्वीकार केला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा