मयूरची दोस्ती आणि गोविंदची जागा

व्हॉइस ओव्हर (समीर) गोविंद आता १० वीत होता आणि तो त्याच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करत होता. त्यामुळे कॉलेजमध्ये मला नवीन मित्राची गरज होती. आणि ती जागा भरली माझ्या नवीन दोस्त मयूरने! मयूर हा माझा ११ वी मधला खास दोस्त बनला. आम्ही दोघे वेगवेगळ्या कॉलेजमध्ये होतो, पण मयूर नेहमी मला भेटायला माझ्या कॉलेजमध्ये यायचा. मयूरने मला खूप साथ दिली आणि आम्ही दोघे जिगरी दोस्त बनलो. व्हॉइस ओव्हर (समीर) मयूर खूप चांगला होता, पण कधीकधी तो नकळतपणे माझ्या जुन्या जखमेवर बोट ठेवायचा.मयूर (M) (एकदा समीरला उत्साहाने) अरे समीर! तुला माहीत आहे का? मी काल मनीषाला (स्नेहाला) एका मुलासोबत पाहिलं! व्हॉइस ओव्हर (समीर) मयूरचं ते बोलणं ऐकून मला दुःख झालं. पण मला आता मनीषाच्या प्रेमातून बाहेर पडायचं होतं. समीर (S) (हळू, पण ठाम आवाजात) अरे, ती मला खूप आवडायची! पण आता मी तिच्या लायकीचा नाहीये, दोस्ता! मयूर (M) (शंका व्यक्त करत) हो ना, पण तो मुलगा कोण होता? तिचा भाऊ असेल! समीर (S) (स्वतःला समजावत) हो, तिचा भाऊ असेल! मयूर (M) नाही रे! मला वाटतं तो तिचा बॉयफ्रेंड होता! व्हॉइस ओव्हर (समीर) बस! मला हे ऐकून घ्यायचं नव्हतं. मी लगेच मयूरला थांबवलं. समीर (S) (गंभीर होऊन, मयूरच्या खांद्यावर हात ठेवत) हे पाहा मयूर! तुला जर माझा खास दोस्त बनायचा असेल, तर मनीषाविषयी काहीही सांगायचं नाही! तिला कोणासोबत फिरायचे आहे, हा तिचा खाजगी प्रश्न आहे! समीर (S) आणि तिच्याविषयी मला काहीही सांगू नकोस. आता तिचे आणि माझे रस्ते वेगळे आहेत! व्हॉइस ओव्हर (समीर) मयूरला माझी ती गोष्ट पटली. त्या दिवसापासून मयूरने मनीषाचा विषय काढला नाही. मी मनीषाला विसरण्याचा प्रयत्न करत होतो, पण मला माहीत होतं... ती अजूनही कुठेतरी माझ्या मनात होती. पण आता मी माझ्या भविष्याला महत्त्व देणार होतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"प्रत्येक सुरुवात अधूरीच राहिली"

मनीषाचे घर आणि गोल्डन पेनचे रहस्य

गिरणीजवळील अनपेक्षित भेट