"प्रत्येक सुरुवात अधूरीच राहिली"

पात्र परिचय:समीर (S): (मुख्य पात्र) पहिलीच्या वर्गात जाणारा मुलगा. आई (M): समीरची आई. मोठी बहीण (B): समीरपेक्षा ५ वर्षांनी मोठी (१०-१२ वर्षांची). दादा (D): मोठा भाऊ, समीरपेक्षा ४ वर्षांनी मोठा (९-११ वर्षांचा). वडील (F): समीरचे वडील. शाळेतला पहिला दिवस' (समीर) (सकाळचा शांत आवाज) आज तो दिवस होता, ज्याची मी वाट पाहत होतो. आज मी पहिल्यांदा शाळेत जाणार होतो! आई (M) (मायेचा आवाज) बाळा, समीर! लवकर ये नाश्त्याला. शाळेला जायची वेळ झाली. दप्तर तयार आहे ना सगळं? समीर (S) (उत्साहाने) हो आई! मी नाश्ता केला. दप्तरात कंपास, वॉटरबॅग, सगळं ठेवलंय! मला लवकर जायचंय... नवीन दोस्त बनवायचे आहेत! आई (M) (हसून) हो हो! पण ऐक. जर कोणी तुला त्रास दिला, तर रडू नकोस हां! लगेच टीचरला सांगायचं. आणि डब्बा नक्की संपवायचा. मोठी बहीण (B) (थोडी मोठी असल्याचा रुबाब दाखवत) अगं आई! हा बघ कसा दिसतोय! पहिलीत जाणारा हा चिंटू! अरे समीर, मला सांग... तुला एबीसीडी येते का नीट? समीर (S) (थोडा नाराज) मला येतं सगळं! मी दादापेक्षा हुशार आहे! दादा (D) (प्रेम आणि आपुलकीने) अरे नाही रे, चिडू नकोस! तू माझ्यापेक्षा हुशार आहेस, म्हणून मी तुला एक खास गोष्ट देतोय. दादा (D) (गर्व आणि प्रेम यातून) हे बघ! हा माझा आवडता गोल्डन कलरचा पेन! हा पेन घेऊन जा. मी हा तुला माझ्या खास वस्तूंपैकी दिला आहे. हा पेन तुझ्या सर्व अभ्यासात मदत करेल. समीर (S) (आश्चर्याने) खरंच? धन्यवाद दादा! वडील (F) (घरातून आवाज येतो) चला! माझा हिरो तयार आहे का? समीर, लवकर ये! आज तुझ्यासोबत शाळेत जायचंय. समीर (S) (हातात गोल्डन पेन घेऊन) हो बाबा! हा बघा... दादाने मला गोल्डन पेन दिला! मी आता खूप अभ्यास करेन. डील (F) (गर्व आणि आनंदात) छान! चल मग! आजपासून तू मोठा झालास. नवीन शाळेत, नवीन मित्रांसोबत नवीन आयुष्य सुरू कर! I am proud of you, Son! आईची माया, बहिणीचा रुबाब आणि दादाचा गोल्डन पेन... आज माझा शाळेतला पहिला दिवस खूप खास होणार होता. दादाचा पेन मिळाला, बाबा सोबत होते, पण शाळेचं गेट जवळ येत होतं तसा जीव घाबरत होता. समीर (S) (रडत, वडिलांचा हात घट्ट पकडून) बाबा! नको ना मला शाळेत जायचं! मला घरी जायचंय! वडील (F) (मायेने, समजावत) अरे बाळा! रडू नकोस. मी आहे ना तुझ्या जवळ. बघ, शाळा सुटली की मी लगेच येतो तुला घ्यायला. तू फक्त थोडा वेळ थांब. समीर (S) (हुंदके देत) खरंच येशील? मला एकटं नाही सोडणार ना? वडील (F) (हसून, खात्रीने) हो बाळा, नक्की येईन. माझा हिरो रडत नाही. टीचर (T) (समीर आणि वडिलांना पाहून) नमस्कार सर! तुमचा मुलगा समीर ना? (समीरकडे बघून) हा खूप रडला आहे वाटतं? वडील (F) (थोडं हसून) हो मॅडम. थोडा घाबरला आहे. पण तो आता ठीक आहे. मी निघतो आता. टीचर (T) (समीरजवळ जात, शांत आवाजात) बाळा! घाबरू नकोस. ये, इथे बस. (वर्गाकडे बघून) चला मुलांनो, आता आपण एकमेकांची ओळख करून घेऊया. टीचर (T) चला, एकापाठोपाठ एक उठा आणि आपलं नाव सांगा. (पहिल्या मुलाकडे बोट दाखवत) तू सांग बाळा!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनीषाचे घर आणि गोल्डन पेनचे रहस्य

गिरणीजवळील अनपेक्षित भेट