नावांचा खेळ आणि मनीषाची एंट्री
मुलगा १ माझं नाव 'सौरभ'!
मुलगी (M) (आत्मविश्वासाने) माझं नाव मनीषा!
टीचर (T) (समीरकडे पाहत) चल बाळा! आता तुझा नंबर! तुझं नाव काय?
समीर (S) (हळूच) माझं नाव... माझं नाव... पिंटू!
टीचर (T) (हसून) अरे! हे काय! पिंटू? खरं नाव सांग बाळा.
समीर (S) (हसतो, मग हळूच) माझं खरं नाव समीर!
टीचर (T) (हसून, आता गंभीर होत) छान! समीर, बस खाली. आता आपण थोडा अभ्यास करूया. चला... एक, दोन, तीन शिकूया!
शाळेतला पहिला दिवस असा काही हसत-खेळत सुरू झाला. मनीषाचा आवाज ऐकून माझ्या मनात काहीतरी वेगळंच झालं होतं.
कशीबशी ओळख झाली. थोडी गंमत झाली, पण आता पोटात भुकेमुळे आग लागली होती. घंटा झाली, आणि मध्यान्ह सुट्टी झाली.
आईने डब्यात काय दिलं असेल? उत्सुकतेने मी डब्बा उघडला... आणि... माझा जीव ओढला गेला.
ओक... मला शिरा अजिबात आवडत नाही!
मला शिरा पाहिला की उलट्या होतात! मी बाहेर जाऊन खूप उलटी केली. भूक लागलेली असूनही मी जेवलो नाही.
भूक नव्हती, पण नजर होती. मनीषाकडे. ती श्रीमंत घरातली होती. तिचे कपडे, तिचे Mickey Mouse चे दप्तर... सर्व काही खूप आकर्षक होतं.
मनीषा (M) (समीरकडे पाहून, उत्सुकतेने) अरे समीर! तू तो गोल्डन पेन घेऊन आला आहेस ना? दाखव ना मला!
समीर (S) (लाजून, हळूच) हा... हा घे.
मनीषा (M) (पेन हातात घेऊन, आनंदात) व्वा! खूप छान चमकतोय हा! कोणी दिला तुला?
समीर (S) (गर्व आणि प्रेम) माझ्या दादाने दिला आहे.
मनीषा (M) (पेन ठेवत) छान! ऐक ना, मला दे हा पेन लिहायला. शाळा सुटल्यावर मी तुला लगेच परत देईन!
ती श्रीमंत घरातली होती. तिने काही मागितलं आणि मी नाही कसं म्हणू? मी तिला पेन मागितलाच नाही. मी तिच्यावर विश्वास ठेवला.
शाळा सुटली. मनीषाने मला पेन परत दिला नाही. पण तिला 'मागू नकोस' असं माझ्या मनातलं 'प्रेम' सांगत होतं. मी खाली मान घालून घरी आलो.
आई (M) (काळजीने) समीर! कसा होता पहिला दिवस? आणि तू डब्बा का संपवला नाहीस?
समीर (S) (चिडचिड करत) ठीक होता दिवस! आणि मला शिरा आवडत नाही!
दादा (D) (उत्साहाने) समीर! माझा गोल्डन पेन कुठे आहे? दाखव!
समीर (S) (लाजतो, खोटे बोलताना) तो... तो मी... शाळेतच ठेवला!
बहीण (B) (शंका घेऊन) काय? शाळेत का ठेवलास? तू विसरला असणार!
समीर (S) (ठामपणे, खोटे) नाही! मी विसरलो नाही! मी उद्या आणतो!
चिंतेचा आवाज) आज दुसरा दिवस होता. काल घरी खोटं बोललो होतो, म्हणून पेन आज कसाही परत हवा होता. पण मनीषाला मागायचा कसा, हा प्रश्न होता.
मित्र १ (F1) (समीरला चिडवत) अरे समीर! कालचा हिरो! काय झालं? गोल्डन पेनबद्दल मनीषाला बोल ना!
मित्र २ (F2) तुझा पेन आहे! तू मागतोस की आम्ही मदत करू?
समीर (S) (लाजून, हळूच) नको रे... ती... ती खूप श्रीमंत आहे. मला भीती वाटत आहे. मी नंतर मागेन.
समीर (S) (मनोहरला हळूच बोलतो) मनोहर! तू... तू तिला बोल ना! तू पण श्रीमंत आहेस ना तिच्यासारखा? तुला नाही बोलणार ती.
मनोहर (N) (आत्मविश्वासाने) ठीक आहे समीर. तू घाबरू नकोस. मी बोलतो तिला.
मनोहर (N) (मनीषाला आवाज देतो) मनीषा! समीरचा गोल्डन पेन?
मनीषा (M) (आश्चर्याने आणि आपुलकीने) अरे हो! मनोहर! माझ्या लक्ष्यातच राहिलं नाही! मला समीरला तो पेन परत करायचा होता!
मनीषा (M) तो माझ्या बॅगमध्ये आहे. थांब, मी लगेच देते त्याला.
मनीषा (M) (समीरजवळ येत, गोड आवाजात) समीर! सॉरी हं! मी काल विसरले तुला पेन द्यायचं. हा घे तुझा पेन.
समीर (S) (हळूच, पेन घेतो) थँक्स मनीषा
(गंभीर, भावनिक आवाज) पेन तर मला परत मिळाला. पण या सगळ्या प्रकारात माझं मन तिच्यामध्ये गुंतून बसलं होतं.
तिच्याबद्दल मनात एक आदर आणि प्रेम निर्माण झालं. माझा तो लाजाळूपणा... आता मनीषासाठी हृदयाची धडधड बनून गेला होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा