गिरणीजवळील अनपेक्षित भेट

(पात्रे: समीर, मनीषा, आई, गिरणीवाला/दोस्त | व्हिज्युअल्स: शाळा सुटणे, रोड, गिरणीचे दुकान) व्हॉइस ओव्हर (समीर) (उत्साह आणि कंटाळा यांच्यातील आवाज) मनीषाला शाळेतून जाऊन काही दिवस झाले होते. माझा शाळा सुटण्याचा वेळ होता दुपारी १:३०. मी एकटाच घरी जात होतो. व्हॉइस ओव्हर (समीर) आणि अचानक... रोडवरच्या त्या गिरणीजवळ माझी नजर थांबली. मनीषाची स्कूल बस (जी सकाळी ७ वाजता सुरू होते) तिथे थांबली होती. व्हॉइस ओव्हर (समीर) तिथे... तिथे ती होती! मनीषा! ती बाहेर उभी होती. तिने बूब कट केला होता! ती खूप वेगळी आणि सुंदर दिसत होती. व्हॉइस ओव्हर (समीर) (हृदयाची धडधड) माझ्या छातीत धडधड सुरू झाली! मला तिला पाहायचं होतं. समीर (S) (गिरणीवाल्या दोस्ताला पाहून, उगाचच) अरे महेश! तू इथेच? काय रे, गिरणी कधीपासून सुरू केलीस? गिरणीवाला (D) (कामात व्यस्त) अरे समीर! तू? हो रे, दोन दिवसांपूर्वीच बाबांनी कामावर बसवलं. काय पाहिजे? समीर (S) (मनीषाकडे पाहत) अ... मला... मला पण पीठ दळायचं होतं. आईने... आईने सांगितलं होतं. इस ओव्हर (समीर) मनीषाच्या आईने तिला पीठ नीट दळून देतात की नाही हे पाहायला सांगितलं होतं. मला वाटलं... ती माझ्यामुळेच इथे थांबली आहे! समीर (S) (झटपट) ठीक आहे महेश! मी लगेच घरी जाऊन पीठ घेऊन येतो! बाय! आई (A) (आश्चर्याने) अरे! समीर? इतका धावत का आलास? काय झालं? समीर (S) (श्वास घेत) आई! आई... लवकर! मला... मला पीठ दे ना दळायला! मी लगेच गिरणीतून दळून आणतो! आई (A) (मनात विचार - VO) काय झालं याला? हा कधी स्वतःहून काम करत नाही आणि आज स्वतःहून पीठ दळायला मागतोय? आई (A) (हसून) अरे बाळा! पण मी तर आज सकाळीच दळून आणले! समीर (S) (मोठा धक्का, निराश) काय? कधी? पण... पण लाईट नव्हती ना काल! व्हॉइस ओव्हर (समीर) (मनात विचार) आई कधी गिरणीत गेली आणि लाईट कशी गेली नाही? मला मनीषाला पुन्हा भेटायचं होतं! समीर (S) (धावत) मला जायलाच हवं! व्हॉइस ओव्हर (समीर) मी धावत गिरणीजवळ पोहोचलो... पण... समीर (S) (मनात विचार) ती गेली! ती वाट पाहत नव्हती. व्हॉइस ओव्हर (समीर) आज तिने मला पाहिले की नाही, हे मला कळलेच नाही. पण ती तिथे थांबली होती... हेच माझ्यासाठी पुरेसे होते. आमचं 'हवेसारखं प्रेम' आजही सुरू होतं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"प्रत्येक सुरुवात अधूरीच राहिली"

मनीषाचे घर आणि गोल्डन पेनचे रहस्य