मनीषाचे घर आणि गोल्डन पेनचे रहस्य
(पात्रे: मनीषा, मनीषाची आई (M.I.) | व्हिज्युअल्स: मनीषाचे घर, गोल्डन पेन)
व्हॉइस ओव्हर (मनीषा) (शांत, विचारमग्न आवाज) समीरने मागितला नाही, पण मीही त्याला तो पेन परत दिला नाही. खरं तर... मला तो पेन स्वतःजवळ ठेवायचा होता.
आई (M.I.) (मनीषाच्या खोलीत येते) काय ग मनीषा? आज शाळेतून आल्यावर शांत का आहेस? काही त्रास झाला का?
मनीषा (M) (हळूच) नाही आई. त्रास नाही झाला. फक्त... आज एका मित्राचा पेन माझ्याकडे राहिला आहे.
आई (M.I.) (हसून) ठीक आहे! त्याला उद्या परत दे. कोण आहे तो मित्र?
मनीषा (M) (थोडी लाजते) तो... तो समीर आहे. आणि तो पेन खूप खास आहे. त्याच्या दादाने त्याला दिला आहे.
आई (M.I.) (समजून घेत) खास आहे म्हणून तू स्वतःजवळ ठेवला आहेस! हो ना?
मनीषा (M) (मनात विचार - VO) आईला कसं सांगू की, तो पेन फक्त पेन नाही. त्याच्या लाजाळूपणाचं आणि माझ्या मनातल्या प्रेमाचं प्रतीक आहे.
मनीषा (M) (आईला साधे उत्तर देते) हो आई. उद्या देईन त्याला.
इस ओव्हर (मनीषा) तो गरीब असो वा श्रीमंत... मला काही फरक पडत नव्हता. माझा Mickey Mouse चा मोठा दप्तर त्याच्या साध्या दप्तरापेक्षा मोठा असला, तरी त्याने मला हसून 'सर्व चेंडू पाहिजेत' असं विचारलं, तेव्हा माझं मन जिंकलं होतं.
इस ओव्हर (मनीषा) समीरचं माझ्याबद्दलचं प्रेम... ते हवेसारखं होतं. त्याला सिद्ध करायची गरज नव्हती.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा