क्रिकेटचा खेळ आणि अनपेक्षित घटना

समीर आणि मित्र शाळेच्या मैदानात क्रिकेट खेळत आहेत. मुले आनंदी दिसत आहेत. आधीचा आनंदी आवाज, आता गंभीर) शाळेतला दिवस असाच हसत-खेळत जात होता. मनीषासोबत माझे एक वेगळेच नाते बनले होते. समीर (S) (उत्साहाने) शाब्बास रे! अजून एक चौकार! मित्र ३ (F3) अरे! चेंडू नर्सरीच्या आत गेला! मी जातो आणायला! इस ओव्हर (समीर) तो नर्सरीच्या आत गेला... आणि काही सेकंदातच एक किंचाळी ऐकू आली. मित्र ३ (F3) (मोठ्याने ओरडत) आ... आऊच! काहीतरी चावले मला! समीर (S) (घाबरलेला) काय झालं रे? समीर आणि इतर मुले घाबरून त्याच्याजवळ जातात. मित्र १ (F1) मॅडम! एका मुलाला काहीतरी चावले आहे! त्याला दवाखान्यात घेऊन चला! टीचर (T) (काळजीने) काय झालं बाळा? काहीतरी चावले वाटते. चला, आपण लगेच दवाखान्यात जाऊया! डॉक्टर (Dr) (हात पाहून) घाबरू नका! काही विशेष नाही. साध्या किड्याने चावले असेल. ही पट्टी बांधा. व्हॉइस ओव्हर (समीर) डॉक्टरना वाटले साधे चावले आहे. पण ते साप चावले होते! व्हॉइस ओव्हर (समीर) दुसऱ्या दिवशी सकाळी... आम्हाला धक्का बसला. तो मुलगा... मरण पावला होता. व्हॉइस ओव्हर (समीर) ही घटना शाळेसाठी एक मोठा धक्का होता. सर्व पालक घाबरले होते. मनीषाची आई (M.I.) (मनीषाच्या वडिलांशी बोलताना) नाही! मी मनीषाला या शाळेत ठेवणार नाही. हे खूप धोकादायक आहे. मनीषा (M) (समीरजवळ येते, डोळ्यात पाणी) समीर... मी... मी उद्यापासून शाळेत येणार नाही. माझे ॲडमिशन दुसरीकडे घेणार आहेत. समीर (S) (डोळे भरून) नाही मनीषा! तू जाऊ नकोस! व्हॉइस ओव्हर (समीर) आणि असेच... मनीषा शाळेतून निघून गेली. आमची ती छोटी भेट... आमचं ते 'हवेसारखं प्रेम'... एका क्षणात तुटून गेलं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"प्रत्येक सुरुवात अधूरीच राहिली"

मनीषाचे घर आणि गोल्डन पेनचे रहस्य

गिरणीजवळील अनपेक्षित भेट