गिरणीजवळचा खेळ (पाठलाग आणि निराशा)

(पात्रे: समीर, मनीषा, मयूर, | व्हिज्युअल्स: गिरणीचे दुकान, समीरचे घर) व्हॉइस ओव्हर (समीर) (लांबलेल्या उत्सुकतेचा आवाज) मनीषाला पुन्हा भेटण्यासाठी मी गिरणीची वेळ, सुरू होण्याची वेळ आणि कोण पीठ दळायला येते, ही सर्व माहिती मिळवली. मयूरला (माझा दोस्त) मी खबरी म्हणून तिथे ठेवलं. मयूर (M) (समीरला हळूच सांगतो) समीर! ती आली! मनीषा आली आहे! व्हॉइस ओव्हर (समीर) (खुश होऊन) मला माहित होतं, तिला कळलं आहे की मी येतोय. ती पण खुश होती, पण दाखवत नव्हती. व्हॉइस ओव्हर (समीर) ती पाठीमागून उभी राहायची, जेणेकरून मी तिला पाहिलं नाही, असं तिला वाटावं. मनीषा (M) (मैत्रिणीला हळूच) अगं, तो समीर माझ्याकडे पाहतोय का बघ ना? समीर (S) (मयूरला चिडून) मयूर! ती पोरगी कोण आहे? तिच्यासोबत मैत्री कर आणि विचार मनीषा काय बोलत होती! व्हॉइस ओव्हर (समीर) (राग आणि कंटाळा) खूप दिवस हेच चाललं होतं. मनीषा माझ्याकडे पाहत नाही, तर मी का तिच्याकडे पाहू? माझा धीर सुटत चालला होता!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"प्रत्येक सुरुवात अधूरीच राहिली"

मनीषाचे घर आणि गोल्डन पेनचे रहस्य

गिरणीजवळील अनपेक्षित भेट