ट्युशनमधील दुरावा आणि अडथळा

(पात्रे: समीर, मनीषा, ट्युशन सर (T.S.), मनीषाची मैत्रीण | व्हिज्युअल्स: ट्युशन क्लास, प्रश्नमंजुषा) व्हॉइस ओव्हर (समीर) (आशेचा आवाज) व्यायामाचा नाद सोडला, पण मनीषाला भेटायची नवी जागा शोधली— मॅथ्सचं ट्युशन! व्हॉइस ओव्हर (समीर) आमची भेट व्हायची, पण नियतीला तेही मान्य नव्हते. ट्युशन सर (T.S.) (समीरला शांतपणे) समीर, मनीषा उद्यापासून क्लासला येणार नाही. तिच्या वडिलांनी मला घरी शिकवण्यासाठी बोलावले आहे. व्हॉइस ओव्हर (समीर) (दुःखद आवाज) श्रीमंती पुन्हा आडवी आली! तिच्या वडिलांनी सरांना घरी बोलावले होते. आता ती फक्त परीक्षांच्या वेळीच ट्युशनला यायची. व्हॉइस ओव्हर (समीर) जेव्हा ती ट्युशनला यायची, तेव्हा माझ्यासाठी तो मोठा दिवस असायचा. तिला पाहणं, हाच माझा अभ्यास होता. ट्युशन सर (T.S.) चला मुलांनो! आज आपण एक 'पॉईंट्स गेम' खेळूया! जो सर्वात जास्त गुण मिळवेल, तो जिंकेल! ट्युशन सर (T.S.) (प्रश्न विचारतात) हा प्रॉब्लेम कोणी सोडवला? मनीषा? मनीषा (M) (लाजून, मैत्रिणीला हळूच) तू सांग ना उत्तर! मनीषाची मैत्रीण (F) (उठून) सर! उत्तर हे आहे... व्हॉइस ओव्हर (समीर) मला माहिती होतं. ती लाजत होती. मी तिला मदत करायचं ठरवलं. समीर (S) (जाणीवपूर्वक) सर! मला वाटतं, 'ब' उत्तर बरोबर आहे. ट्युशन सर (T.S.) (मनीषाच्या मैत्रिणीला उद्देशून) बरोबर! मनीषाच्या ग्रुपला दोन पॉईंट्स! आणि समीर... तू खूप अभ्यास कर! व्हॉइस ओव्हर (समीर) मी जाणीवपूर्वक चूक उत्तरे देत होतो, जेणेकरून मनीषा जिंकावी आणि ती खुश व्हावी. तिच्या विजयातच माझा आनंद होता! मनीषाची मैत्रीण (F) (ट्युशन सुटल्यावर समीरला भेटते) समीर! तू जाणीवपूर्वक चूक उत्तरं का देत होतास? समीर (S) (हसून, शांतपणे) तिला जिंकायला आवडतं. व्हॉइस ओव्हर (समीर) मनीषा खूप अभ्यास करत होती, माझ्याकडे लक्ष देत नव्हती. पण तिचं लाजून उत्तर सांगणं... आणि तिचं ट्युशनमध्ये येणं... हेच माझ्यासाठी पुरेसं होतं. व्हॉइस ओव्हर (समीर) मी तिला जिंकवून देत होतो आणि ती मला 'हवेसारखं प्रेम' देत होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"प्रत्येक सुरुवात अधूरीच राहिली"

मनीषाचे घर आणि गोल्डन पेनचे रहस्य

गिरणीजवळील अनपेक्षित भेट